स्क्रिन शेअरिंग ॲप डाऊनलोड करण्यासाठी फसवणूक करणारे ग्राहकाला फसवतात.
•अशा ॲपचा वापर करून फसवणूक करणारे ग्राहकाचा मोबाइल / लॅपटॉप / नियंत्रित करू शकतात आणि ग्राहकाच्या आर्थिक विश्वासार्हतेत प्रवेश मिळवू शकतात.
•फसवणूक करणारे या माहितीचा वापर ग्राहकांच्या इंटरनेट बँकिंग / पेमेंट ॲप्सचा वापर करून निधीचे अनधिकृत हस्तांतरण करण्यासाठी किंवा पेमेंट्स करण्यासाठी करतात.
•जर आपल्या डिव्हाइसमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला असेल आणि आपल्याला कोणतेही स्क्रीन शेअरिंग ॲप डाउनलोड करण्याची आवश्यकता असेल तर आपल्या डिव्हाइसवरून पेमेंटशी संबंधित सर्व ॲप्स निष्क्रिय / लॉग आऊट करा.
•कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर दिसणाऱ्या कंपनीच्या अधिकृत टोल फ्री नंबरवरून सल्ला दिला तरच असे ॲप्स डाऊनलोड करा. कंपनीच्या एखाद्या अधिकाऱ्याने आपल्या वैयक्तिक संपर्क क्रमांकाद्वारे तुमच्याशी संपर्क साधला तर असे ॲप्स डाऊनलोड करू नका.
•काम पूर्ण होताच, स्क्रीन शेअरिंग ॲप आपल्या डिव्हाइसमधून काढून टाकल्याची खात्री करा.