• ग्राहक आपल्या बँकेचे, विमा कंपनीचे संपर्क तपशील / कस्टमर केअर क्रमांक, आधार अपडेशन केंद्र वगैरे मिळवण्यासाठी सर्च इंजिनचा वापर करतात. सर्च इंजिनवरील हे संपर्क तपशील बर्याचदा संबंधित संस्थेचे नसतात परंतु ते तसे असल्याचे भासवतात.
•ग्राहक सर्च इंजिनवर बँक / कंपनीचे संपर्क क्रमांक म्हणून दर्शविलेल्या फसवणूक करणार्यांच्या अज्ञात / अप्रमाणित संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकतात.
•एकदा ग्राहकांनी या संपर्क क्रमांकावर कॉल केला की, फसवणूक करणारे ग्राहकांना त्यांचे कार्ड क्रेडेन्शियल्स / तपशील पडताळणीसाठी सामायिक करण्यास सांगतात.
•फसवणूक करणारा चा खरा प्रतिनिधी आहे असे गृहीत धरून, ग्राहक त्यांचे सुरक्षित तपशील सामायिक करतात आणि अशा प्रकारे फसवणूकीला बळी पडतात.
•बँका / कंपन्यांच्या अधिकृत संकेतस्थळांवरून ग्राहक सेवा संपर्क तपशील नेहमी मिळवा.
•सर्च इंजिन रिझल्ट पेजवर थेट प्रदर्शित होणाऱ्या नंबरवर कॉल करू नका कारण हे अनेकदा फसवणुकीद्वारे लपवले जातात.
•कृपया हे देखील लक्षात घ्या की कस्टमर केअर नंबर कधीही मोबाइल नंबरच्या स्वरूपात नसतात.
å